Translate

Sunday, 30 August 2020

होणार तुम्हीही बुद्ध !!!


अंतरीच्या अशुद्धी पुढे 
ही बाहेरची घाण फारच शुद्र
मन ठेवा शुद्ध* 
होणार तुम्हीही बुद्ध!

 - © हर्षिता




* "मन कसे शुद्ध ठेवायचे?"  किंवा "नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी मनोविकासाची गरज" या विषयावर लवकरच लेख प्रसिद्ध होइल, ई-मेल व्दारे वैयक्यतिक रित्या हा लेख आणि पुढील ब्लॉग हवे असल्यास आपला ईमेल  Follow by Email  च्या खलील रिकाम्या बॉक्स मध्ये आपला ईमेल पाठवावा किंवा  Contact Form मध्ये रि जी लेख हवा असेल तसे कळवा .... आपणास लेख पाठविला जाईल. 

दमायच नाय



दमणाऱ्याला जमणार नाय
जमवायच आसल तर दमायच नाय.

कायपण होऊ द्ये, कायपण बोलू द्ये.
ऐकून जनाच, आपलच करायच,
जिकायच आसल तर हारायच नाय.
जमवायच आसल तर दमायच नाय.

पाहाडा एवड आयुष्य हाय 
आन चिमणी एवडा त्यो जिव
पाहाड पार करायचा तर 
जिवावर* येवू द्यायच नाय
जमवायच आसल तर दमायच नाय.

खर वागायच, खर बोलायच,
मन बी आपल पाक ठेवायच,
नुकसान कोणाच करायच नाय,
आपल्या सुखापायी, कोणाला दुखवायच नाय.
जमवायच आसल तर दमायच नाय.

विकायच हाय, टिकायच हाय
जमेल तोवर राबायच हाय
झगडा हाय सवतासंगच
सवतालाच मारून सवाल सोडवायचा नाय
तोऱ्यात जगायच तर माग फिरायच नाय
जमवायच आसल तर दमायच नाय.
आरं, जमवायच हाय, तर दमायच नाय.

 - © हर्षिता



* - कंटाळा

Friday, 28 August 2020

टाकाऊतून टिकाऊ ;-)




आयुष्य कितीही भंगार असो,
तुमचा हसमुख चेहरा 
त्याला सुंदर आणि कलात्मक बनवून जातो...
यलाच म्हणतात ,
'टाकाऊतून टिकाऊ'

 - © हर्षिता

समय


कुछ बंद सा कर दिया था,
समय के दायरे में हमने खुदको 
अब समय भी हमें कहाँ छोड़ेगा 
आझाद खुली हवाओं की हदको 

एक बताऊं,...?
...
अभी तो खुली हवाओं का ही वक्त हैं दोस्तों, 
समय भी अब कहाँ सुनेगा...
सुनेंगे हम गौर से उसे तब...,
समय हमारा फिर वापस मिलेगा।

- © हर्षिता 

सोनेरी किरण - आशेचा


दारातून माझ्या डोकावून पाहतो 
हसतो अन हसवितो,
अंधाराच्या कवेत शिरतांनाही,
आशेचा सोनेरी किरण दाखवून जातो 

 

- ©  हर्षिता

 

Thursday, 27 August 2020

देवमाणूस


देव नको मला,
देवमाणूस आहेत खूप.
माणसांमधले देवत्व,
करते मला चूप.

- © हर्षिता

 

Tuesday, 25 August 2020

दिल की गहराई

 

असली ज़िंदगी 

हमारी सोच बदल देती हैं

उस वक्त ना हम हम रहते हैं 

ना ख़्वाब अपने…

सच्चाई से पाला पड़ता हैं 

तब ज़िंदगी का मतलब भी 

बड़ी जोर-जोर से सुनाई देता हैं..

...मानो दिल के गहराई में दबा कोई तूफ़ान 

अंदर ही अंदर शोर मचा रहा हो...

- © हर्षिता
- 6-Jan 2015
- 5:30pm

सीख दर्द से... :-)


हर वो दर्द....
मरने का मतलब 
और...
जीने की असली वजह
सीखा  जाता हैं |

             जिसने सीखा उसे 'जीने की कला' आ गयी |

 - © हर्षिता

Monday, 24 August 2020

यश तुझ्या कवेतच आहे !!! - Short

तू लढा दिलास,

तू लढा दिलास,....

जिंकणं तुझ्या हाती आहे;

पाखरा, आकाशी झेप घेतली,

आता आकाश तुझे आहे.

 

अपयश, पळून जाईल तुझ्या मेहनती पुढे,

जरा वळून तर बघ......,

यश तुझ्या कवेतच आहे;

यश तुझ्या कवेतच आहे.

 

 - © हर्षिता

यश तुझ्या कवेतच आहे !!! - Long

Image may contain: text 

आयुष्य तुझे आहे,

ते तुलाच जगायचं आहे;

असेल जरी काळोख चहूकडे,

ही उद्याच्या पहाटेची चाहूल आहे.


कुणाच्या तरी सोबतीची गरज भासते,

जेव्हा संकटांच्या भोवऱ्यात अडकतो;

साऱ्या विश्वाची साथ मिळते हो,

जो सुविचारांचा धागा पकडतो.


जगण्याच्या खुणांच्या शोधात,

अजूनही तुझा तोल जातो आहे;

यशापयशाच्या सुख-दु:खात,

स्वतःलाच वाहवत नेतो आहे.


माझ्यातला ‘मी’ पणा,

सर्वांमध्येच असतो;

तरीच, कुणी कुणाचा नाही येथे,

एकटेच येतो आणि एकटेच जातो.

 

तेव्हा.., यशस्वी जीवन जगण्याचा,

लढा तुलाच द्यायचा आहे;

लढताना मात्र तुला काही,

मर्यादाही सांभाळायच्या आहे.

 

लढण्यास का बरं डरतोस ?

हाती इतकी शस्त्रे असताना;

फक्त थोड्या हिंमतीची गरज असते,

योग्य शस्त्र चालवताना.


Image may contain: text 


एकाग्रता, सजगता, संयम आणि समता

हीच ती तुझी शस्त्रे आहेत;

पावलो-पावली वापरलेस,

तर मित्र सख्खे आहेत.

 

या शस्त्रांशी खेळ, कधी अजबच खेळतो,

मन घायाळ-घायाळ करून घेतो;

अन वार जेव्हा होतो नियतीचा,

तेव्हा बचाव फक्त ‘स्व’चा करतो?

 

कितीही बचाव केला ‘स्व’चा, तरीही,

नियतीचा पुन्हा पुन्हा वार होतो;

घायाळ असतांनाही आयुष्यात

वादळांशी लढा द्यावा लागतो....

 

अरेच्चा!!! तू लढा दिलासही....!

 

शाब्बास!!! तू लढा दिलास,

जिंकणं तुझ्या हाती आहे;

पाखरा, आकाशी झेप घेतली,

आता आकाश तुझे आहे.

 

अपयश, पळून जाईल तुझ्या मेहनती पुढे,

जरा वळून तर बघ......,

यश तुझ्या कवेतच आहे;

यश तुझ्या कवेतच आहे.

 

 - © हर्षिता

जंजीरें.... अज्ञानता की.....!!!???

कोशिश हजार हुई हमें रोकने की मगर,

वह कलम ही थी जो की जंजीरों मे जकड़े पांव काटकर, 

सुनहरी रोशनी की ओर बढने मे सहारा बनी....

वर्ना अपने ही अज्ञानता की ये जंजीरें... 

न जाने किस जंजाल मे फसाकर हमें कंकाल बना देती...

- © हर्षिता 

आदर्श जिंदगी

आझाद जिंदगी - आदर्श जिंदगी 


अक्सर वही जिंदगी आदर्श बन जाती है,

जिसे बनाने की कोशिश में लगा रहता है,

वह जिंदा इन्सान... अपने आखरी दम तक.....

 ....आज़ादी से 

- © हर्षिता  

Sunday, 23 August 2020

"रोशनी यूँही मिलती नहीं"


"आज दिए की लौ से बात हुयी,

                   कह रही थी, जलते हुए,

        'अँधेरा चाहे दुनिया का हो,

                                    या अपना,

               खुद को जलाये बिना,

                         अँधेरा मिटता नहीं,

                और रोशनी यूँही मिलती नहीं'

- © हर्षिता 

 

ये जिंदगी यही समेट लो !

 
लिखो वह जिंदगी,
जो सीखीं हो अनुभवों से

पढ़ो वह सीख,
जो लिखी हो, अनुभवों कि जिंदगी से

आसान हैं जिंदगी,
थोड़ी रोशनी जगा लो

खोल दो दरवाजे
और हँसते हुये, जिंदगी के पास आ जाओ

खोल दो बाहें,
और जिंदगी को गले लगा लो

चलो सही राह पर,
और जिंदगी के राही बन जाओ

मन को पकड़ लो
और मन के मालिक बन जाओ

ध्यान से ध्यान करों
और खुद में सारा जहाँ देख लो

बिखरी जिंदगी छुपी हैं यही
उसे यही समेट लो

ये जिंदगी यही समेट लो !

- © हर्षिता 

 


Meditation

Meditation आपको, आपकी मेहनत को एकाग्र, मजबूत और खुबसूरत बना देता है । - हर्षिता 

Friday, 21 August 2020

शुद्ध

 


मी कोण?

नावं माझ काय?

रहातो कुठे?

अन् करतो मी काय?

 

आई नाही, बाप नाही

शाळा नाही, स्वप्न नाही

सगे सोयरे माझे पाय.

लेकरू मी या मातीचा

ही धरती माझी माय.

 

खूप पाहिली भांडणे

अन् चिडून केली सुद्धा,

कचराच कारण याचे

हे कळले होते त्या बुद्धा

 

कचरा वेचणाऱ्या माझ्या आईला

भांडण करून बापानं मारलं,

दारू पिऊन कचऱ्यात पडलेल्या..,

माझ्या बापाला त्याच्या कर्मानं मारलं

 

हा कचरा..., इथे होणारी भांडणे...

पुन्हा पुन्हा जुन्या आठवणी करून देतात,

पोटाला भाकर तुकडा देऊन

कधी डॉक्टर मास्तर प्रेमाने कुरवाळतात.

 

इथे येणारे खूप येतात

काय काय सांगून शिकवून जातात..

म्हणे..

अंतरीच्या अशुद्धी पुढे ही बाहेरची घाण फारच छुद्र

मन ठेवा शुद्ध होणार तुम्हीही बुद्ध!

नाटक करून पर्यावरण जागृतीवर

स्वच्छताही करून जातात...

बोलत होते

वातावरणातील घाणीमुळे मनेही घाण होतात.

घाणेरड्या मनांमुळे वातावरणही घाण....

 

काही समजले नाही

मिळालेल्या पैश्याच काहीतरी घ्याव

म्हणून तेथून निघून गेलो

परत आल्यावर समोरचे दृश्य..

... पाहून चकितच झालो

वा किती स्वच्छ आणि शांत वाटतंय..

जाणू माझ्या गरीब अस्वच्छ आईन सुंदर शांत परीच रूप घेतलाय.

 

हातातील पांढरे शुभ्र कबुतर दाखवून

तिने जवळ मला बोलावलं,

गरिबी श्रीमंतीच्या या सीमारेषेवर

मला अंतर्बाह्य शुध्द केलं.

 

आम्ही सोडून आकाशी त्या काबुतारास..

दिला शांतीचा संदेश जगाज..

शुध्द आहे मी, शुध्द माझी माय

असा भास झाला माझ्या मनास

 

शुद्ध आणि शांत होऊन

त्या माउलीच्या कुशीत झोपलो..

अचानक काहीतरी घडलं

अन् दचकून जागा झालो..

पाहतो तर काय मी रस्त्याच्या कडेला झोपलेला होतो.

आणि एक बाई मला ओरडून तेथेच कचरा फेकत होती

मी तर ऐकले अन् पाहत राहिलो तिला शांत राहून,

अंगावर चुकून उडालेल्या कचऱ्यावरून..भांडणच केले तिने दुसरीकडे जाऊन

ती स्वच्छता ती शांतता

क्षणभरात लोप पावली

मला प्रेमाने सांगणारी

माझी माउलीच आठवली

पुन्हा कचरा, पुन्हा कटकट,

पुन्हा चिडचिड, पुन्हा भांडण

पुन्हा पुन्हा तीच ती गाऱ्हाणी

आई म्हणे मला, याला म्हणतात

पालथ्या घड्यावर पाणी

 

अंतरीच्या अशुद्धीपुढे ही बाहेरची घाण फारच क्षुद्र

खरे कारण न जाणता बोलून जातात अभद्र

 

तेथे पडलेल्या मनातल्या माझ्या कचऱ्यानं

आवाज दिला, मीही याचाच भाग होणार काय ?

मन झटकून तेथील कचरा उचलला

जाणीवेतून आत्मा म्हणाला – शुध्द झालो मी शुध्द होणार माझी माय