Translate

Sunday, 30 August 2020

दमायच नाय



दमणाऱ्याला जमणार नाय
जमवायच आसल तर दमायच नाय.

कायपण होऊ द्ये, कायपण बोलू द्ये.
ऐकून जनाच, आपलच करायच,
जिकायच आसल तर हारायच नाय.
जमवायच आसल तर दमायच नाय.

पाहाडा एवड आयुष्य हाय 
आन चिमणी एवडा त्यो जिव
पाहाड पार करायचा तर 
जिवावर* येवू द्यायच नाय
जमवायच आसल तर दमायच नाय.

खर वागायच, खर बोलायच,
मन बी आपल पाक ठेवायच,
नुकसान कोणाच करायच नाय,
आपल्या सुखापायी, कोणाला दुखवायच नाय.
जमवायच आसल तर दमायच नाय.

विकायच हाय, टिकायच हाय
जमेल तोवर राबायच हाय
झगडा हाय सवतासंगच
सवतालाच मारून सवाल सोडवायचा नाय
तोऱ्यात जगायच तर माग फिरायच नाय
जमवायच आसल तर दमायच नाय.
आरं, जमवायच हाय, तर दमायच नाय.

 - © हर्षिता



* - कंटाळा

1 comment: