मी कोण?
नावं माझ काय?
रहातो कुठे?
अन् करतो मी काय?
आई नाही, बाप नाही
शाळा नाही, स्वप्न नाही
सगे सोयरे माझे पाय.
लेकरू मी या मातीचा
ही धरती माझी माय.
खूप पाहिली भांडणे
अन् चिडून केली सुद्धा,
कचराच कारण याचे
हे कळले होते त्या बुद्धा
कचरा वेचणाऱ्या माझ्या आईला
भांडण करून बापानं मारलं,
दारू पिऊन कचऱ्यात पडलेल्या..,
माझ्या बापाला त्याच्या कर्मानं मारलं
हा कचरा..., इथे होणारी भांडणे...
पुन्हा पुन्हा जुन्या आठवणी करून देतात,
पोटाला भाकर तुकडा देऊन
कधी डॉक्टर मास्तर प्रेमाने कुरवाळतात.
इथे येणारे खूप येतात
काय काय सांगून शिकवून जातात..
म्हणे..
अंतरीच्या अशुद्धी पुढे ही बाहेरची घाण
फारच छुद्र
मन ठेवा शुद्ध होणार तुम्हीही बुद्ध!
नाटक करून पर्यावरण जागृतीवर
स्वच्छताही करून जातात...
बोलत होते
वातावरणातील घाणीमुळे मनेही घाण होतात.
घाणेरड्या मनांमुळे वातावरणही घाण....
काही समजले नाही
मिळालेल्या पैश्याच काहीतरी घ्याव
म्हणून तेथून निघून गेलो
परत आल्यावर समोरचे दृश्य..
... पाहून चकितच झालो
“वा किती स्वच्छ आणि शांत वाटतंय..
जाणू माझ्या गरीब अस्वच्छ आईन सुंदर शांत
परीच रूप घेतलाय.
हातातील पांढरे शुभ्र कबुतर दाखवून
तिने जवळ मला बोलावलं,
गरिबी श्रीमंतीच्या या सीमारेषेवर
मला अंतर्बाह्य शुध्द केलं.
आम्ही सोडून आकाशी त्या काबुतारास..
दिला शांतीचा संदेश जगाज..
“शुध्द आहे मी, शुध्द माझी माय”
असा भास झाला माझ्या मनास
शुद्ध आणि शांत होऊन
त्या माउलीच्या कुशीत झोपलो..
अचानक काहीतरी घडलं
अन् दचकून जागा झालो..
पाहतो तर काय मी रस्त्याच्या कडेला झोपलेला
होतो.
आणि एक बाई मला ओरडून तेथेच कचरा फेकत होती
मी तर ऐकले अन् पाहत राहिलो तिला शांत
राहून,
अंगावर चुकून उडालेल्या कचऱ्यावरून..भांडणच
केले तिने दुसरीकडे जाऊन
ती स्वच्छता ती शांतता
क्षणभरात लोप पावली
मला प्रेमाने सांगणारी
माझी माउलीच आठवली
पुन्हा कचरा, पुन्हा कटकट,
पुन्हा चिडचिड, पुन्हा भांडण
पुन्हा पुन्हा तीच ती गाऱ्हाणी
आई म्हणे मला, याला म्हणतात
पालथ्या घड्यावर पाणी
अंतरीच्या अशुद्धीपुढे ही बाहेरची घाण फारच
क्षुद्र
खरे कारण न जाणता बोलून जातात अभद्र
तेथे पडलेल्या मनातल्या माझ्या कचऱ्यानं
आवाज दिला, मीही याचाच भाग होणार काय ?
मन झटकून तेथील कचरा उचलला
जाणीवेतून आत्मा म्हणाला – शुध्द झालो मी
शुध्द होणार माझी माय
Commendable
ReplyDeleteAll poems are good and really meaningful
ReplyDelete