हे आयुष्य सुंदर होतय
अंधारातून प्रकाशात येतय
अज्ञानाचा गुंता सुटतोय
सत्याचा उलगडा होतोय
भरकटणाऱ्या चंचल मनाला
आदर्श सोनेरी मार्ग मिळतोय
घडतांना होणाऱ्या घावांना
मायेचा मलमही लागला जातोय
हे सार काही फक्त तुमच्या मुळेच....
मला आणि माझ्यासारख्या अनेकांना
तुमचे मार्गदर्शन, तुमची माया,
प्रेम आणि मैत्री
असेच सदैव लाभो
- © हर्षिता
No comments:
Post a Comment