Translate

Tuesday, 10 November 2020

“तो”

 

“तो”

 

जेथे नांदतात फक्त

स्वर्थाचेच विचार

कशाला आशेल मग तेथे

माणुसकीला पाहुणचार

 

ज्याला नको त्याला जेथे..

मिळतो भरपूर सन्मान

मनाच्या माणसाला लाथाळून

मिरवितात भलतेच शान..

 

मेहनत करणारा ‘तो’ जेथे

रडत बसतो गुढघ्यात

फक्त कागदावरच केलेल्या कामांसाठी

हार पडतात घोटाळा करणाऱ्यांच्या गळ्यात

 

एखादा व्यक्ती ‘तो’

त्यांच्या बळीचा बकरा बनतो

वर्षभर इतरांसाठी लढून

अखेर स्वतःसाठी चारा आणतो

 

एखादा ‘तो’ त्याच्या आयुष्यात

नसतोच एक किरण सूर्याचा

कुणाच्यातरी मेहेरबानीपुढे

जाळतो दिवा त्याच्या स्वप्नांचा

 

एखाद्याच्या नशिबाची जेथे

होते वारंवार परीक्षा

पुन्हा ‘तो’ कश्याला बाळगेल तेथे

कोरड्या यशाची अपेक्षा

 

स्वप्न पाहणाऱ्यांच्या जेथे

पूर्ण कधीही होत नाहीत आशा

तरीही का असाव्या त्यांच्या

नव्या क्षितिजाच्या अभिलाषा?

 

आशा अभिलाशांचा खेळ

त्या निर्मात्यानच मांडला

मग माणूस माणसाला विसरला

तेव्हा डाव हा त्याने सांडला

सांडलेल्या त्या विषावर

मुक्तपणे नाचला

मेहनत करणारच होता ‘तो’

अखेर मेहनतीनच मेला

 

तरीही निराश न होता

सुचल्या पुढच्या ओळी

‘सत्याचा अखेर होतो विजय’

हे ऐकले होते एके काळी

 

'तो' होता कुणीतरी, आहे कुणीतरी

'तो' राहणार कुणीतरी

आशेशिवाय करणार काय

जिंकल्या शिवाय, राहणार नाय

तोच 'तो' जो तुमच्या माझ्यात हाय


 - © हर्षिता

 

2 comments:

  1. खुप छान आहे कविता

    ReplyDelete