Translate

Tuesday, 10 November 2020

श्रमिक

 



आला काळ, गेला काळ

'काळ' सांगून येत नाय

होत्याचे नव्हते ते

नव्हत्याचे होते तरी काय?

 

श्रमतो माणूस नेहमीच

कधी फळ, निष्फळ कधी

श्रमिकाच्या मनामध्ये

कधी आशा, निराशा कधी


श्रम - श्रमिक गणित एक

हिशोब-पैसा मालकच करी

काळ असा की, फळ नसे

चल-चल म्हणत, श्रमच करी....


चालत राहतो न थकता 

श्रमिक मनाचा, हे मन श्रमिकाच

जगण्यासाठी मर-मर मरतो, 

अन् मरणही जगतो पथिकाच 

मरणही जगतो श्रमिकाच

मरण जगतो श्रमिकाच


 - © हर्षिता


No comments:

Post a Comment